धम्मपद १. यमकवग्ग १.स्वभावाच्या पुढे मन असते, मन सर्वश्रेष्ठ आहे, विकृत मनाने बोलतो, किंवा कृती करतो तेव्हा, त्याच्यामागे दुक्ख असे येते जसे बैलांच्या पावलामागे बैलगाडीचे चाक जाते (१) २.स्वभावाच्या पुढे मन असते, मन सर्वश्रेष्ठ आहे, प्रसन्न मनाने बोलतो वा कृती करतो तेव्हा, त्याच्या मागे सुख येते जशी सावली.(२) ३.मला अपमानिले, माझा शेवट केला, मला जिंकले, जे असे वैर धरतात, त्याचे वैर शमत नाही.(३) ४.मला अपमानिले, मला जिंकले, माझाशेवट केला, असे वैर जे धरत नाहीत, त्यांचेच वैर शमते.(४) ५.वैराने वैर शमत नाही, ते अवैरानेच शमते हाच सनातन धर्म (पुर्वापार सिद्धांत) आहे.(५) ६.त्यांचे नव्हे, आपण मरणारच आहोत, हे जे जाणित नाहीत.. त्यांचेच वैर शमते, आपण मरणारच आहोत हे जाणतात.(६) ७.फक्त चांगलेच पहात फिरणारा, इंद्रियांवर ताबा नसलेला, भोजनाची योग्य मात्रा न जाणणारा, निरुद्योगी, हिंमत हारलेला, त्याला, भुलैया असे जिंकतो जसे वारा झाडाला वाकवितो.(७) ८. फक्त चांगलेच न पहात फिरणारा, इंद्रियांवर योग्य ताबा असलेला, भोजनाची योग्य मात्रा जाणणारा, प्रयत्नशील, हिंमतवान, त्याला भुलैया जिंकु शकत नाही, जसा वा...