मन माणसाला परिपूर्ण बनवत किव्हा अधोगतीला घेऊन जात तुमच्या मनात कुठल्या प्रकारचे विचार आहेत त्यावरून तुमचा मार्ग ठरतो तो मार्ग दुःखमय आहे कि सुखमय म्हणून माणसाचं मन हे प्रमुख मुख्य आहे खालील धम्मपदातील गाथेत म्हटल्या प्रमाणे 


मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।

मनसा चे पदुट्ठेन भासति वा करोति वा ।

ततो नं दुक्खमन्वेति चक्कं व वहतो पदं ।। १ ।।


मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्ठा मनोमया ।

मनसा चे पसन्नेन भासति वा करोति वा ।

ततो नं सुखमन्वेति छाया व अनपायिनी ।। २ ।।


मन हेच प्रमुख आहे, मनोमय आहे, श्रेष्ठ आहे.

जर कोणी दुष्ट मनाने बोलतो किव्हा वागतो 

जसे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पाठी मांगे चाके येतात त्याच प्रमाणे दुःख त्याच्या पाठी मांगे येते 

किव्हा जर कोणी प्रसन्न मनाने बोलतो किव्हा वागतो तसे माणसाच्या छाये प्रमाणे सुख त्याच्या पाठीमागे आपोआप येते 

म्हणून दुष्ट मनाने बोलने किव्हा वागण्या पेक्षा प्रसन्न मनाने बोला आणि वागा (आचरण करा)

हाच तुमचा दुःखाकडून सुखाकडे जाणारा मार्ग आहे 


सतीश पवार ( पालि अभ्यासक )

Comments

Popular posts from this blog

2- झेन कथा "ध्यानाचे महत्व" मराठी

सावित्रीबाई फुले यांच्या जीवन आणि कार्यावरील प्रभावी भाषण

26 जानेवारीचे ऐतिहासिक महत्त्व// Mr. Satish Pawar